Ghodegaon electricity issue: आठ दिवसांपासून वीज गायब; घोडेगावातील ३० हेक्टरवरील पिके करपली

Ghodegaon Power Outage : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील सालोबा मळ्यात १०० केव्हीचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने आठ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे ३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. डीपी तातडीने बसविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Farmers in Saloba Mala, Ghodegaon, face crop losses after an eight-day power outage.

Farmers in Saloba Mala, Ghodegaon, face crop losses after an eight-day power outage.

esakal

Updated on: 

घोडेगाव : येथील सालोबा मळा येथील शेतकरी यांना मागील तब्बल ८ दिवसांपासून १०० KV ची DP (ट्रांसफॉर्मर) जळल्यामुळे संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येत नसल्याने सुमारे ३० हेक्टर क्षेत्रावरील पिके जळून खाक झाली आहेत. शेतीमालाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. वीज मंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही दाहीदिशा भटकावे लागत आहे. महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात परिसरातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...