

PNE26W63506 -
फोटोओळ :
सोलापूर : ‘घोषनिनाद’ कार्यक्रमात १२ वाद्यांचे सामूहिक वादन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्ह्यातील स्वयंसेवक.
१२ वाद्यांचा एकसूर; ११३ स्वयंसेवकांचा घोषनिनाद
संघाच्या शताब्दीनिमित्त सावरकर स्मारकावर एक तास घोषवादन; ३० रचनांची प्रस्तुती
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ : घोषदंडाच्या आज्ञेवर ११३ स्वयंसेवकांची १२ वाद्ये एकाच वेळी निनादली आणि अशोक चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक परिसर घोषसंगीताने दुमदुमला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त रविवारी सायंकाळी आयोजित ‘घोषनिनाद’ कार्यक्रमात शहर व जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी एक तास सामूहिक वादन केले. अनक, पनव, शृंगदल, झल्लरी अशा वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांसह एकूण १२ वाद्यांतून ३० रचना सादर करण्यात आल्या.
आठ दिवसांच्या सरावातून ३० रचना
या कार्यक्रमासाठी शहर व जिल्ह्यातील ११३ स्वयंसेवकांनी आठ दिवस सराव केला. दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी वादनाचा सराव केला. शंखातून श्रीराम, उदय, सोनभद्र, मेवाड, चेतक, अजय आणि किरण, तर वंशीमधून भूप, शिववंदन, जन्मभूमी, मीरा, तिलंग आणि शिवरंजनी या रचना सादर करण्यात आल्या. शृंग वाद्यातून मीरा, तिलंग, शिवशक्ती, आसावरी, तिलककामोद आणि जयोस्तुते या रचनांचे वादन झाले.
१२ वाद्यांतून घोषसंगीताचा आविष्कार
अनक, पनव, वंशी, शृंगदल, शंख, झल्लरी, त्रिभुज, नागंद, वेणु, मोझरिका, तुर्य आणि स्वराज या १२ वाद्यांचा वादनात समावेश होता. कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रत्येक वाद्याची माहिती देण्यात आली.
घोषदंडाच्या सूचनांनुसार सामूहिक वादन
संपूर्ण गणवेशातील घोषवादकांना जिल्हा सह घोषप्रमुख दत्तात्रय येमूल हे घोषदंडाच्या माध्यमातून सूचना देत होते. त्यांच्या सूचनांनुसार ११३ स्वयंसेवकांनी समन्वयाने वादन केले. या वेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
मान्यवरांची उपस्थिती; प्रार्थनेने समारोप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुनील इंगळे आणि अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख नीलेश क्षीरसागर यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. जिल्हा घोषप्रमुख जगदीश कर्रे यांनी मार्गदर्शन केले. नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल यांच्यासह नागरिक उपस्थित होते. संघाच्या प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.