Ganesh Idols Get GI Tag : राज्यातील नऊ वस्तूंना ‘जीआय’ मानांकन ; गणेश हिंगमिरे यांचे प्रयत्न,आंतरराष्ट्रीय ओळख

एकावेळी राज्यातील नऊ वस्तूंना भौगोलिक सूचकांक (जीआय) मानांकन प्राप्त झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि संवर्धनाला मोठा उपयोग होणार आहे. जीआय मानांकन विषयातील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांच्या प्रयत्नातून शक्य झाले आहे.
Ganesh Idols Get GI Tag
Ganesh Idols Get GI Tagsakal

पुणे : एकावेळी राज्यातील नऊ वस्तूंना भौगोलिक सूचकांक (जीआय) मानांकन प्राप्त झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि संवर्धनाला मोठा उपयोग होणार आहे. जीआय मानांकन विषयातील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांच्या प्रयत्नातून शक्य झाले आहे. विशेष म्हणजे आसाममधील बोडोलॅंडच्या १३ वस्तूंनाही हिंगमिरे यांच्या प्रयत्नातून जीआय मानांकन मिळाले आहे.

राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील एका उत्पादनाला किंवा वस्तूला जीआय मानांकन प्राप्त व्हावेत म्हणून हिंगमिरे यांनी प्रयत्न केले आहेत. ते म्हणाले, ‘‘राज्यातील ३८ उत्पादनांना जीआय मानांकन प्राप्त करण्याचे भाग्य मला लाभले. खरेतर ही चळवळ पुण्यातूनच सुरू झाली. २००७ मध्ये पुणेरी पगडीला मानांकन प्राप्त झाले होते. आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ वस्तूंना जीआय मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न झाले. त्यातीलच या नऊ गोष्टींचा समावेश आहे.’’

Ganesh Idols Get GI Tag
Pune University : विद्यापीठातील लाचखोरी लाजिरवाणी ; विद्यार्थी समितीचे कुलगुरूंना पत्र,तक्रार निवारण केंद्राची मागणी

एखाद्या वस्तूचा इतिहास, भूगोल आणि शास्त्र बघितल्यानंतरच जीआय मानांकन प्राप्त होते. अशा मानांकनामुळे संबंधित वस्तू किंवा उत्पादनाचे संवर्धन तर होते; शिवाय त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखही प्राप्त होते. यामुळे त्याची निर्यात करणे शक्य होत असल्याचेही हिंगमिरे यांनी सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे हे मानांकन असल्याचे हिंगमिरे म्हणाले.

या वस्तूंना मानांकन

  • कवड्याची माळ : तुळजापूर, धाराशिव

  • पानचिंचोली चिंच : लातूर

  • भोरसरी डाळ : लातूर

  • काष्टी कोथिंबीर : लातूर

  • दगडी ज्वारी : जालना

  • कुंतलगिरी खवा : धाराशिव

  • पेणचे गणपती

  • बहाडोली जांभूळ

  • बदलापूर जांभूळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com