

अजगराने फस्त
केल्या सहा कोंबड्या!
जालना, ता. १२ : तालुक्यातील खणेपुरीत १० फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या अजगराने सहा कोंबड्या गिळल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत त्याला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडले.
खणेपुरी परिसरातील शेतकरी राम गाढे यांच्या कुक्कुटपालनाच्या आवारात मंगळवारी सकाळी अजगर आढळून आला. त्याने सहा कोंबड्या गिळल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अजगर १० फूट लांबीचा असल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, माहिती मिळताच सर्पमित्र शिवाजी डाखुरकर, भागवत कांबळे घटनास्थळी पोचले. प्रभू गाढे, भागवत जाधव, अंकुश गाढे यांच्या प्रयत्नांनंतर अजगराला पकडण्यात आले. त्यानंतर अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.