सामाजिक सुरक्षेच्या लाभासाठी 
९० दिवस काम करणे अनिवार्य

सामाजिक सुरक्षेच्या लाभासाठी ९० दिवस काम करणे अनिवार्य

Published on

सामाजिक सुरक्षेच्या लाभासाठी
९० दिवस काम करणे अनिवार्य

गिग वर्करबाबत केंद्र सरकारचे मसुदा नियम जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २ ः केंद्र सरकारने मसुदा नियम जाहीर करून प्रथमच  अ‍ॅपवर काम करणाऱ्या कामगारांना (गिग वर्कर्स)औपचारिक सुरक्षा कवच  प्रदान करण्याची तरतूद  केली आहे. या नियमांनुसार  गिग वर्करना किमान वेतन,आरोग्य विमा, जीवन विमा आणि अपघात विमा यासारखे सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळवण्यासाठी  किमान ९० दिवस एका कंपनी किंवा अ‍ॅपसोबत  काम करणे अनिवार्य असेल. 
केंद्रीय कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या मसुद्यानुसार  किमान वेतन  भौगोलिक क्षेत्र, अनुभव और कौशल्य स्तराच्या निकषांवर निश्चित केले जाईल. जर गिग वर्कर एकापेक्षा जास्त कंपन्यांसोबत काम करीत असेल, तर त्याने मागील आर्थिक वर्षात एकूण किमान १२० दिवस काम केलेले असावे. ज्या दिवशी गिग वर्करची  कमाई सुरू होईल त्या दिवसापासून तो कंपनीशी जोडलेला मानला जाईल. एखादा गिग वर्कर एकाच दिवशी अनेक कंपन्यांसाठी काम करीत असेल, तर प्रत्येक कंपनीचा दिवस वेगवेगळा मोजला जाईल. म्हणजे, एकाच दिवशी तीन ॲपसाठी काम केले तर ३ दिवस मोजले जातील.
सोळा  वर्षांवरील सर्व गिग वर्करना आधार क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या मदतीने नोंदणी करावी लागेल. कंपन्यांना गिग वर्कर्स किंवा प्लॅटफॉर्म वर्करची माहिती एका केंद्रीय पोर्टलवर द्यावी लागेल. या माहितीच्या आधारे  युनिव्हर्सल अकाउंट नंबर किंवा युनिक आयडी तयार केली जाईल. पात्र आणि नोंदणीकृत प्रत्येक वर्करला डिजिटल किंवा छापील ओळखपत्र  दिले जाईल. त्यावर फोटो आणि इतर माहिती असेल. हे ओळखपत्र  केंद्रीय पोर्टलवरून डाऊनलोड करता येईल. केंद्र सरकारने नेमलेल्या  अधिकारी किंवा संस्थेच्या माध्यमातून संबंधित कंपन्यांकडून  अंशदान गोळा केले जाईल. हा निधी  सोशल सिक्युरिटी फंडात जमा करून गिग वर्करसाठी वेगळ्या खात्यात ठेवले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com