बाजारभाव घसरल्याने आले उत्पादक चिंतेत
चाकण, ता.१ : सातारा जिल्ह्यातील आल्याला चाकण बाजारपेठेत मोठी मागणी आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाहतूक खर्च, उत्पादन खर्च ही शेतकऱ्यांचा भागत नाही असे आले उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. चाकण बाजारपेठेत सध्या आवक वाढली आहे.
चाकण हे औद्योगिक तसेच व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे राज्यातील विविध भागांतून तसेच नवी मुंबई, पनवेल, खोपोली , पिंपरी चिंचवड,अहिल्यानगर भागातून खरेदीदार येतात. किरकोळ विक्रेते तसेच प्रक्रिया उद्योगांकडून आल्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. आल्यास विशेषतः मसाला उत्पादन आणि हॉटेल व्यवसायासाठी साताऱ्याचे आले पसंतीस उतरते. उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे तसेच बाजारातील वाढत्या आवकेमुळे आल्याचे आल्याचे बाजारभाव घसरले आहेत. काही आठवड्यांपूर्वी प्रतिक्विंटलला मिळणारा भाव समाधानकारक होता; परंतु सध्या तो लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.अनेक शेतकऱ्यांनी अपेक्षित भाव न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे.
उन्हाळ्यात आल्याची साठवण क्षमता कमी होते. उष्णतेमुळे माल खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे बाजारात आले लवकर विक्रीस काढले जाते. परिणामी पुरवठा वाढून दर घसरतात. निर्यातीत घट व स्थानिक मागणीतील चढ-उतार याचाही परिणाम भावावर होत आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
आल्याचे घाऊक बाजारात भाव निम्म्याने घटले आहेत. प्रति किलोला भाव चाळीस ते पन्नास रुपये
आहेत. भावात अजून घसरण झाल्यास शेतकऱ्यांना काहीच परवडणार नाही असे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे ,सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.
10246
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

