Girish Bapat: लॉकडाऊनमध्ये बापटांनी हॉटेलमध्ये केला होता स्वयंपाक! काय आहे किस्सा? वाचा

गिरीश बापट यांच्या व्यक्तीमत्वाच्या अनेक आठवणी त्यांच्या मित्रांनी शेअर केल्या आहेत.
girish bapat
girish bapat

पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचं आज 74 व्या वर्षी निधनं झालं. यानंतर त्यांच्या जवळच्या आणि परिचयाच्या लोकांनी त्यांच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहे. बापटांच्या साध्या जीवनशैलीचाही पुण्यातील अनेकांना परिचय आहे. त्यांच्या या व्यक्तीमत्वाची एक खास आठवण यानिमित्त समोर आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात बापट यांनी चक्क पुण्यातील एका हॉटेलमध्ये जाऊन लोकांच्या सेवेसाठी स्वतः स्वयंपाक केला होता. (Girish Bapat himself cooked in hotel girija Pune during lockdown)

girish bapat
Made in India iPhone: 'मेड इन इंडिया' आयफोनला मोठी मागणी! ६५ टक्क्यांनी वाढली विक्री

गिरीश बापट आणि त्यांचा कट्टा

गिरीश बापट हे पुण्याचे कारभारी होण्याआधी नगरसेवक त्यानंतर आमदारही राहिले होते. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती होतीच पण त्याबरोबरच त्यांच्या पुण्यातील कट्ट्याची नेहमी चर्चा रंगत असे. फार कमी लोकांना माहिती असावं की कोरोनाच्या महामारीत गिरीश बापट यांनी पुण्यातील एका हॉटेलात जाऊन सामान्यांच्या सेवेसाठी स्वतः स्वयंपाक केला होता. या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे या हॉटेल गिरीजाचे मालक चंद्रकांत सणस यांनी.

girish bapat
Amritpal Singh: खलिस्तानी अमृतपाल सिंगचं पंजाब सरकारला आव्हान! म्हणाला, जर मला अटक...

चंद्रकांत सणस म्हणतात, बापटांच्या जाण्यानं भयंकर पोकळी निर्माण झाली आहे. बापट हे बापटच होते, त्या माणसाची सर कोणाला येणार नाही. कशावर पण प्रेम करणारा माणूस म्हणजे बापट. आमच्या हॉटेल गिरीजामध्ये सर्व मित्र भेटतात याचं त्यांना खूप बरं वाटायचं. मित्रमंडळी, पत्रकार यांच्याशी आमची हॉटेलमध्ये चर्चा व्हायच्या, बऱ्याचसे हास्यविनोद व्हायचे. रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही कधी कधी गप्पा मारत बसायचो. त्यांना खाण्याची प्रचंड आवड होती.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

हॉटेलमध्ये केला होता स्वयंपाक

खाण्याबरोबरच स्वतः करुन खायला त्यांना आवडायचं. नगरसेवक असल्यापासून माझे त्यांचे संबंध आहेत. आमदारकी किंवा खासदारकी असो कुठलाही फॉर्म भरायचा असला तरी मला आणि आमच्या कट्ट्यावर भेटल्याशिवाय ते जायचे नाहीत. विजयोत्सव साजरा करायलाही ते कट्ट्यावर यायचे. हॉटेलला कसली अडचण असली तरी ते मदतीसाठी सदैव तयार असायचे. लॉकडाऊनमध्ये आम्ही दोन हजार लोकांना जेवायला घालत होतो. यामध्ये बापटांचा खारीचा वाटा होता. बापट त्यावेळी सांगायचे की याची भाजी बनवू आज. स्वतः ते खाण्याचे शौकीन असल्यानं या काळात ते स्वतः आमच्या हॉटेलच्या किचनमध्ये स्वयंपाक करायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com