Sakal Saam Survey : पुण्याच्या प्रश्नांसाठी नेटाने संघर्ष पण किती कामे पूर्ण झाली ? खासदारांचा लेखाजोखा

पुणे शहराचा विस्तार वेगाने होत असतानाच शहरीकरणाच्या वाढत्या रेट्यामुळे नवे प्रश्न निर्माण होत
girish bapat
girish bapatesakal

पुणे शहराचा विस्तार वेगाने होत असतानाच शहरीकरणाच्या वाढत्या रेट्यामुळे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. त्याची दखल घेत सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांतील प्रकल्प मार्गी लागावे यासाठी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी नेटाने प्रयत्न केले. खासदार झाल्यावर दोन वर्षांतच कोरोनाचे संकट आले.

तरीही त्या काळात जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्नांची सोडवणूक करण्यावर बापट यांनी भर दिला. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत बापट यांना सर्वाधिक म्हणजे तब्बल ६ लाख ३२ हजार (६१.१३ टक्के) मते मिळाली. चार वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार, मंत्री, पालकमंत्री असा लोकप्रतिनिधीत्त्वाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या बापट यांनी लोकसभेत झोकात पदार्पण केले. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ३० खासदारांचा समावेश असलेल्या अंदाज समितीचे अध्यक्षपद केंद्र सरकारने त्यांच्याकडे सोपविले.

‘जायका’, नदीसुधार, मेट्रो आणि विस्तारीकरण, पुणे (लोहगाव) विमानतळाचे विस्तारीकरण, पुणे, शिवाजीनगर आणि हडपसर रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, स्मार्ट सिटी आदी प्रकल्पांसाठी बापट यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. या प्रकल्पांची कामे पुण्यात सुरू झाली आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रयत्न

पुणे-नाशिक रेल्वेसाठी पाठपुरावा करूनही अद्यापही हा प्रकल्प केंद्र सरकारकडे रखडला आहे कॅंटोन्मेंट बोर्डांचे स्थानिक स्वराज्य संस्थांत विलीनीकरण व्हावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्याला थोडेफार यश आले असून त्या बाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे यासाठीही त्यांनी प्रयत्न केले पण, अद्यापही हा प्रकल्प फारसा पुढे सरकलेला नाही. त्यामुळे पुणेकरांना परदेशगमनासाठी आजही मुंबई, दिल्ली विमानतळांवरच अवलंबून राहावे लागत आहे.

रूपी बॅंकेच्या खातेदारांना न्याय

पुण्यातील रूपी बॅंकेच्या खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे त्यांनी दोन वेळा बैठका घेतल्या. खातेदारांची त्यांच्याशी भेट घडवून आणून दिली. त्यामुळे खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यास प्रारंभ झाला. खासदार असतानाच बापट यांनी समान पाणी पुरवठा योजना वेगाने व्हावी, समाविष्ट २३ आणि ११ गावांतील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, आदी विविध प्रश्नांसाठी महापालिकेत बैठका घेतल्या तर, पुणेकरांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि शेतीसाठीही पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी कालवा समितीमध्ये आवाज उठविला.

महत्त्वाची कामे

लोहगाव विमानतळासाठी नाममात्र भाडेतत्त्वावर भूखंड मिळाला

बहुमजली पार्किंग (एरोमॉल) कार्यान्वित झाली

जायका, नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू झाले

मेट्रोच्या भूसंपादनातील अडचणी दूर करण्यात यश

खडकीतील संरक्षण खात्याच्या जागेतून मेट्रोला परवानगी

पुण्यातील रूपी बँकेच्या खातेदारांना ठेवी मिळवून देण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा

समान पाणीपुरवठा योजनेसाठी बैठका

  • ६८ टक्के संसदेतील उपस्थिती

  • (१ जून २०१९ ते ६ एप्रिल २०२३ )

  • ३६७ विचारलेले प्रश्न

  • २७ चर्चांमध्ये सहभाग

  • १७ कोटी मिळालेला निधी

  • १५ कोटी एकूण विनियोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com