ज्वेलर्समध्ये जाऊन उच्चभ्रू तरूणी कारायची 'हे'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पुणे : लष्कर परीसरातील एका सराफी दुकानामध्ये ग्राहक बनुन गेलेल्या उच्चभ्रु राहणीमान असणाऱ्या तरुणीने सोन्याच्या दोन अंगठया चोरल्या होत्या. गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने अटक केली.

स्नेहलता वसंत पाटील (वय 25, रा.कोथरुड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर परीसरातील सेंट्रल स्ट्रीट येथील खरी पेढी ज्वेलर्स येथे 20 जानेवारी रोजी एक उच्चभ्रू राहणीमान असलेली अनोळखी तरुणी खरेदीच्या बहाण्याने दुकानामध्ये आली. तिने हातचालाखीने 10 ग्राम वजनाच्या 50 हजार रूपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या घटनेबाबत लष्कर पोलिस ठान्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाकडून समांतर तपास करण्यात आला. संबंधित तरुणीबाबत पोलिस कर्मचारी मोहसीन शेख यांना खबर मिळाली. त्यानुसार, तिला एनआयबीम रोड येथील क्लोव्हर प्लाझा मॉल येथून ताब्यात घेन ताब्यात घेण्यात आले. तिच्याकड़े कसून तपास केल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक यशवंत आंब्रे, पोलिस कर्मचारी मोहसीन शेख, अतुल गायकवाड,गोपाळ मदने यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A girl Arrested for stealing gold ring

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: