कासारवाडी जिल्हा परिषद शाळेत बालिका दिन साजरा
कासारवाडी शाळेत
बालिका दिन साजरा
........
पांगरी : कासारवाडी (ता. बार्शी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली. यावेळी सरपंच अश्विनी मंडलिक, उपसरपंच सुधीर गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रीती कांबळे, उपाध्यक्ष अंबिका खाडे उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर वीणा कदम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली. बालिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, रांगोळी ,लिंबू-चमचा व संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुधाकर बडे यांच्यासह वीणा कदम, अभयकुमार कसबे, बिनादेवी दरेकर, बाळासाहेब मुंढे आदींनी परिश्रम घेतले.

