तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girl death mental torture by a boy padmavati taljai

फिर्यादी व संशयित आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहतात. फिर्यादीस 20 वर्षांच्या मुलीला आरोपी मागील सहा महिन्यांपासून त्रास देत होता. फिर्यादीच्या मुलीला "मी तुझ्यावर प्रेम करतो, तु माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही' अशा शब्दात धमकी देत होता.

तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या 

पुणे : तरुणाकडून लग्न करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या धमक्‍या व त्रासाला कंटाळून एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पद्मावतीमधील तळजाई वसाहत परिसरात 12 मार्चला घडली. सनी ढाकले (रा.तळजाई वसाहत, पद्मावती) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आरोपीविरुद्ध आत्महत्या करण्यास परावृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संशयित आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहतात. फिर्यादीस 20 वर्षांच्या मुलीला आरोपी मागील सहा महिन्यांपासून त्रास देत होता. फिर्यादीच्या मुलीला "मी तुझ्यावर प्रेम करतो, तु माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही' अशा शब्दात धमकी देत होता. त्याचबरोबर, "या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला व तुझ्या भावाला सोडणार नाही' अशा शब्दात सातत्याने त्रास देत होता. मागील सहा महिन्यांपासून आरोपी तिला मानसिक त्रास दिला जात होता. या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने 12 मार्चरोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे करीत आहेत. 

loading image
go to top