पिंपरीत सेप्टिक टँकमध्ये पडलेली 4 वर्षीय मुलगी सुखरूप बाहेर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

पिंपरी : देहूरोड कॅन्टोन्मेंट येथे एका सेप्टिक टँकमध्ये(सांडपाण्याची टाकी) पडलेल्या ४ वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि लष्कराच्या जवानांना यश आले. 

पिंपरी : देहूरोड कॅन्टोन्मेंट येथे एका सेप्टिक टँकमध्ये(सांडपाण्याची टाकी) पडलेल्या ४ वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि लष्कराच्या जवानांना यश आले.  कोमल असे त्या मुलीचे नाव आहे.

पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला लहान मुलगी सेप्टिक टँकमध्ये पडल्याची खबर मिळाली. त्यानंतर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी लगेच घटनास्थळी रवाना झाले. 

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, "आम्ही तेथे पोचलो तेव्हा, सेप्टिक टँकची झाकणे उघडी होती. माझ्या सह लष्कराचे ७ जवानांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. आम्ही काही जण तोंडाला ओला रुमाल बांधून टँकमध्ये उतरले. तेव्हा कोमल तेथील कोरड्या भागात पडल्याचे दिसले. कोमल शुद्धीवर होती. परंतु, दुर्गंधी मुळे तिला त्रास झाला. बहुधा खेळताना ती टँकमध्ये पडली असावी."

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनीही या घटनेला दुजोरा दिला. तसेच मुलीला सुखरूप बाहेर काढल्याचे नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The girl fall in a septic tank in Pimpri