Pune Crime : अल्पवयीन मुलीचा छळ; आरोपीला एक तासात केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime : अल्पवयीन मुलीचा छळ; आरोपीला एक तासात केली अटक

Pune Crime : अल्पवयीन मुलीचा छळ; आरोपीला एक तासात केली अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कन्टोन्मेट : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला एका तासात जेरबंद केले. कोंढवा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या माहितीआधारे आरोपीचा शोध घेत सापळा रचून कारवाई केली. नथुराम काळू शिंदे (वय ५४, रा. रास अपार्टमेंट, संतोषनगर, नवग्रह शनिमंदिरसमोर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू होता. त्यावेळी गुन्ह्यातील आरोपी पळून जाण्याच्या तयार असल्याची पोलिसांना आरोपीची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लुल्लानगर चौक, कोंढवा खुर्द येथे उड्डाण पुलावर सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली.

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार गरूड, पोलीस नाईक जोतिबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, सतिष चव्हाण, लक्ष्मण होळकर, किशोर वळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर करीत आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस ठाण्यातील सर्व पथकांचे अभिनंदन केले.

loading image
go to top