मारहाण करणाऱ्या वडिलांविरोधात मुलीची पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल

The girl lodged a complaint with the police against her father for beating her
The girl lodged a complaint with the police against her father for beating her
Updated on

लोणावळा : मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वडिलांनी मारहाण केल्याचा धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 24 वर्षीय तरुणीनं वडिलांच्या विरोधात मारहाणीची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी वडिलांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


याबाबत लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे एका मुलाशी प्रेम संबंध असल्याचा वडिलांना संशय होता. त्या कारणावरूनच सोमवार (ता.२८ सप्टेंबर) ते शुक्रवार (ता.०२ ऑक्टोबर) या कालावधीत तरुणीला घराबाहेर जाऊ दिलं नाही. तिला घरातच डांबून ठेवण्यात आलं. याशिवाय तिच्याकडे असलेला मोबाईल फोन, लॅपटॉपही वडिलांनी काढून घेतल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसंच वडिलांकडे असलेल्या वस्तू मागितल्याने त्यांनी मारहाण केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. 

शरद पवार संतापले; 'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, यावर कवडीचा विश्वास राहिला नाही!'

तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी वडिलांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याला डांबून ठेवलं आणि मारहाण केली असा आरोप तरुणीने वडिलांविरोधात केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Government Begins Survey of Pre 2011 Government Land Encroachments in Mumbai and Pune for Regularisation
Malin Village Landslide Anniversary 12 Years Since 151 Lives Were Lost in Devastating Pune District Disaster
narayangaon police arrested baliram jalindar tambe beed accused for stealing farmer tractor from pargaon tarfe ale junnar cctv investigation
malthan shirur pune family assault after children dispute sc st atrocity act case prem bhaskar sonawane santosh gurav sachin gurav ravindra bhosale shirur police
Marathi News Esakal
www.esakal.com