अपघातात अपंगत्व आलेल्या तरुणीला कोर्टाचा दणका; नुकसान भरपाईत अर्ध्या कपातीचा आदेश

The girl who was disabled in the accident due to negligence will get half the compensation
The girl who was disabled in the accident due to negligence will get half the compensation
Updated on

पुणे : चालत्या पीएमपी बसमधून उतरल्याने झालेला अपघात तरुणीला शारीरिकदृष्ट्या वेदनादायक ठरला. मात्र 11 लाख 97 हजार 513 रुपये नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असतानाही स्वतःच्या चुकीमुळे अपघात झाल्याने तिला त्यातील अर्धीच रक्कम न्यायालयाने मंजूर केली. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य प्रदीप अष्टुरकर यांनी हा निकाल दिला.

निष्काळजीपणाने अपघात झाल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने संबंधित मुलीला पाच लाख 98 हजार 766 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या प्रकरणात पीएमपी प्रशासन, बसचा मालक आणि विमा कंपनी असलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात जखमी 24 वर्षीय तरुणीने मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे तक्रार दाखल केली होती. विमा कंपनीच्या वतीने ऍड. मनोहर माहेश्‍वरी आणि ऍड. प्रणिता वाळवेकर यांनी, तर पीएमपीच्या वतीने ऍड. अतुल गुंजाळ यांनी काम पाहिले. 4 एप्रिल रोजी 2014 संबंधित तरुणी शिवाजीनगर ते स्वारगेट बसने प्रवास करीत होती. सायंकाळी सहाच्या सुमारास बस मामलेदार कचेरी येथे आली असता तिचा वेग कमी झाला. गाडी पूर्णपणे थांबली नसतानाही तिने चालत्या बसमधून उडी मारली. त्यामुळे तोल जाऊन ती रस्त्यावर पडली व बसचे चाक तिच्या पायावरून गेले. त्यामुळे ती जखमी झाले. बसचालक आणि लोकांनी तिला उपचारासाठी ससून येथे नेले. तेथून तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अपघातात कायमस्वरूपी 51 टक्के अपंगत्व 
या अपघातात तरुणीला कायमस्वरूपी 51 टक्के अपंगत्व आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर दोन महिन्यापेक्षा जास्त काळ उपचार सुरू होते. याबाबत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी बसचा चालक अपघातास जबाबदार असल्याचे सांगत गुन्हा दाखल केला. मात्र, तिने चालत्या बसमधून उतरण्याचा प्रयत्न केल्याचे विमा कंपनीचे वकील माहेश्‍वरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com