पुणे - छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्याय झाल्याने पुण्यात आलेल्या एका तरुणीला पोलिसांनी चौकशीदरम्यान जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तिच्यासह इतर तरुणींनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या देत संताप व्यक्त केला. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी रविवारी रात्री वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.