एनडीएत आता मुलींनाही मिळणार प्रवेश

12 वी नंतर अधिकारी म्हणून रुजू होण्याची संधी
NDA
NDAsakal

पुणे : देशाच्या संरक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी, कायमस्वरुपी आयोग (पर्मनंट कमिशन) यासाठी महिला अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आपली लढाई लढली आहे. या लढ्याला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी महिला अधिकाऱ्यांना पर्मनंट कमिशन तर आता महिला उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रवेश परिक्षेत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे देशातील तरुणींना लष्करात जाण्याचा आणखी एक मार्ग खुला झाला आहे. (Pune News)

एनडीए मध्ये मुलींना प्रवेश देण्याच्या निर्णयाचे विविध महिला व पुरुष अधिकाऱ्यांकडून तसेच सध्या शाळेत असलेल्या मुलींनी स्वागत केले आहे. तर दूसरीकडे काही मुलींनी या प्रवेशासाठी आता त्या पात्र नसल्याची खंत व्यक्त केली. दरवर्षी लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये विविध प्रवेश प्रक्रियांतर्गंत मोठ्या प्रमाणात महिला उमेदवार भाग घेतात. देशात सशस्त्रदलात जाण्यासाठी नौदल ॲकॅडमी, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी आणि हवाईदल ॲकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतात. परंतु यासाठी त्यांना पदवीनंतरच प्रवेश परिक्षा देता येत होती. मात्र पुरुष उमेदवारांप्रमाणे महिला उमेदवारांना बारावीनंतर (१६ वर्षांपासून) लष्करात अधिकारी म्हणून कोणतीच प्रवेश प्रक्रिया किंवा संधी उपलब्ध नव्हती.

NDA
राणेंच्या अटकेपूर्वी दोन तास काय घडलं?

सशस्त्रदलांच्या वैद्यकीय विभागात पुरुष आणि महिला अधिकाऱ्यांना पर्मनंट कमिशन अंतर्गत नियुक्त केले जाते. परंतु आता मुलींना देखील उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. मुला-मुलींना देशसेवेची इच्छा असते तर त्यांना समान संधी मिळणे गरजेचे आहे. संरक्षण क्षेत्रात काम करणे ही अभिमानाची गोष्ट असून पुरुषांप्रमाणे महिलांनाही तशीच संधी मिळायला हवी. त्या अनुषंगाने एनडीए मध्ये मुलींना प्रवेश मिळणार असल्याने ही नक्कीच आनंदाची बाब आहे, असे एका निवृत्त महिला अधिका-याने सांगितले.

  1. - पूर्वी मुलींना सैन्यात भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रतेकरिता पदवीधर असणे आवश्‍यक

  2. - तिन्ही दलातील विविध प्रवेश प्रक्रियांतर्गत वयोमर्यादा ही १९ ते २५ किंवा २६ पर्यंत

  3. - तर बारावीनंतर मिलटरी नर्सिंग ऑफिसर या प्रवेश प्रक्रियेंतर्गत महिला लष्करात

  4. - मिलटरी पोलिस भरती प्रक्रियेद्वारे प्रवेश

NDA
कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही; पटोलेंकडून राणेंच्या वक्तव्याचा निषेध

मार्च २०२१ पर्यंत सशस्त्रदलांमध्ये महिलांची संख्या

(वैद्यकिय, दंत आणि नर्सिंग विभाग वगळून)

दल : संख्या

सैन्यदल : ६७९६

नौदल : १६०२

हवाईदल : ६९६

  • - भारतीय सशस्त्र दलात १९९२ पासून महिलांना प्रवेश सुरु झाला

  • - शिक्षण, लॉजिस्टिक्स आणि कायदा विभागात पाच वर्षांच्या कालावधीसाठी सेवाकार्य

  • - त्यानंतर महिला अधिकाऱ्यांसाठी प्रवेशाचे मार्ग सातत्याने विस्तारत गेल

  • - सेवाकार्याच्या कालावधीतही वाढ होत गेली

NDA
पॉर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

एनडीएत मुलिंच्या प्रवेशाबाबत ही शक्यता :

१) मुलींसाठी अर्ज प्रक्रिया :

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एनडीए -२ ची परिक्षेत मुलांसह मुलींनाही सहभाग घेता येणार आहे. मात्र परिक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आदेशापूर्वीच संपली आहे. त्यामुळे मुलिंना परिक्षेत भाग घेता यावा यासाठी यूपीएससीने मुलींसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अधिसूचना काढणे आवश्‍यक आहे.

२) जागेबाबत स्पष्टता :

या संस्थेत मुलींसाठी नेमकी किती जागा असेल त्याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता नाही. एनडीएच्या प्रत्येक बॅचसाठी सुमारे ४०० प्रशिक्षणार्थ्यांची मर्यादा आहे. त्यामुळे जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता कमी असल्याने मुलांची जागा कमी होऊ शकते. तसेच एनडीए मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर मुलिंनाही लष्करात पर्मनंट कमिशन मिळेल.

नव्या आदेशानुसार आता महिला उमेदवारांनाही एनडीत प्रवेश मिळेल. यामुळे येत्या काळात सशस्त्र दलांमध्ये महिला उमेदवारांची टक्केवारी वाढेल अशी शक्यता आहे. सध्या एनडीए मध्ये मुलींच्या अनुषंगाने प्रशिक्षणाची व्यवस्था, राहण्याची सुविधा करणे आवश्‍यक आहे. तर एनडीएकडे या सर्व सोय सुविधांची उभारणी करण्यासाठी परिक्षेपासून प्रवेश प्रक्रियेपर्यंतचा मुबलक कालावधी आहे.

- लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर, ॲपेक्स करिअर

‘‘सर्वोच्च न्यायालयाने केवळ एवढेच स्पष्ट केले आहे की, मुली एनडीएची परिक्षा देवू शकता. मात्र नंतरच्या बाबी अद्याप स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. तसेच सेनेला याबाबत काही सुचना आलेल्या नाहीत. मात्र असे आदेश देणे नक्कीच आनंदाची बाब आहे. यामुळे महिलांना बळ मिळाणार असून त्या देखील लष्करात चांगल्या पद्धतीने काम करू शकतील.

- फ्लाइट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com