
माजी न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील अल्पसंख्याक समाजास (मुस्लिम समाजासह) १५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी अल्पसंख्याक समाजातील सर्वधर्मीय प्रतिनिधींनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
पुणे - माजी न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील अल्पसंख्याक समाजास (मुस्लिम समाजासह) १५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी अल्पसंख्याक समाजातील सर्वधर्मीय प्रतिनिधींनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अल्पसंख्याक समाजातील ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, शीख, बौद्ध, पारशी आणि ज्यू समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या मागणीसाठी सर्वानुमते स्वतंत्र ठराव मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी प्रा. प्रदीप फलटने, नरेंद्र सिंह बक्षी, संजय गायकवाड, जिक्रीया शेख, मुकुंद भोरे, थॉमस जोसेफ, रिफेंस अलफोन्सो, कांचन दोडे, जॅकलीन फॉरेस्टर, उस्मान आगा, राजकुमार जैन आणि राजश्री शिरवळकर आदी उपस्थित होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कुलभूषण विभूते यांनी सर्वानुमते महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या उपाध्यक्षपदी डॉ. मॅन्युअल डिसूझा यांच्या नियुक्ती करण्यात येत असल्याचे सांगितले.
Edited By - Prashant Patil