सकाळ न्यूजलेटर

सकाळ न्यूजलेटर
Published on

जागतिक घडामोडींचा वेध घेण्यासाठी ‘द ग्लोबल ब्रीफ’

‘सकाळ’ आणि ‘एपी ग्लोबाले’चे नवे साप्ताहिक न्यूजलेटर

पुणे, ता. १९ : जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचे विश्‍लेषण भारतीय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘एपी ग्लोबाले’तर्फे ‘द ग्लोबल ब्रीफ’ हे साप्ताहिक न्यूजलेटर वितरित केले जाणार आहे.
आधुनिक काळात संपूर्ण जग परस्परावलंबी झाल्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यात घडलेल्या घटनांचे पडसाद आणि परिणाम थेट दुसऱ्या कोपऱ्यातही जाणवतात. यामुळे जागतिक घडामोडींची माहिती आणि त्याचे संभाव्य परिणाम, त्याचे विविध कंगोरे आपल्याला माहित असणे, अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. याच उद्देशाने साप्ताहिक न्यूजलेटरला सुरुवात करण्यात येत आहे.
दर आठवड्याला प्रसिद्ध होणाऱ्या न्यूजलेटरमध्ये जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी, धोरणात्मक निर्णयांचे विश्‍लेषण आणि संबंधित विषयांतील तज्ज्ञांचे भाष्य, असा सखोल मजकूर उपलब्ध करून दिला जाणार आहे. एखाद्या घटनेची केवळ बातमी नव्हे, तर त्यामागील कारणे, त्याचे संभाव्य परिणाम आणि अशा घटनांना असलेले जागतिक भू-राजकीय संबंधांचे कंगोरे अशा सर्वांचा यात आढावा घेतला जाणार आहे.
जागतिक घडामोडींची माहिती घेण्याची आवड असलेल्या व्यक्ती, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अशा सर्वांसाठी न्यूजलेटर उपयुक्त ठरणार आहे. यात विविध देशांतील मान्यवर व्यक्तींपासून प्रशासनातील अनुभवी व्यक्ती त्यांचे विश्‍लेषण करणार आहेत.

तुम्ही यासाठी उत्सुक आहात का?
न्यूजलेटर सबस्क्राइब करण्यासाठी तुम्ही केवळ तुमच्या पसंतीच्या समाज माध्यमांवरील चॅनेलचा क्यूआर कोड स्कॅन करा आणि कम्युनिटी जॉइन करा. यावर तुम्हाला न्यूजलेटरसंदर्भातील सर्व घडामोडी नियमित उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी बातमीबरोबर जोडलेले क्यूआर कोड स्कॅन करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com