पुणे प्रादेशिक विभागातील 16 वीजयोद्धांसह उत्कष्ट उपकेंद्र; डिजिटल कार्यालयांचा गौरव 

The glory of Excellent substation with 16 power fighters and digital offices  in Pune Regional Division
The glory of Excellent substation with 16 power fighters and digital offices in Pune Regional Division
Updated on

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळातही अखंडित वीजपुरवठा व ग्राहकसेवेसाठी विशेष कामगिरी बजावणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील 16 अभियंते, तांत्रिक कर्मचारी या कोरोना वीजयोद्धांसह उत्कृष्ट उपकेंद्र व डिजिटल शाखा कार्यालयांना पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव व निसर्ग चक्रीवादळाच्या काळात अखंडित वीजपुरवठा व ग्राहकसेवेसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडलनिहाय प्रत्येकी एक शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची कोरोना वीजयोद्धा म्हणून निवड करण्यात आली. यासोबतच ग्राहकसेवा, वसुली व सुरळीत वीजपुरवठ्याच्या निकषानुसार परिमंडलनिहाय एक उपविभागीय कार्यालय, महावितरण पोर्टल व ऍपद्वारे 'ऑनलाईन' काम करणाऱ्या डिजिटल शाखा कार्यालय, बिघाडरहित व आदर्शवत उत्कृष्ट उपकेंद्रांची देखील मंडलनिहाय प्रत्येकी एक अशी निवड करण्यात आली.
 
पुण्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची रिपरिप सुरूच; पुढील 3-4 दिवस पावसाची शक्यता

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते पुणे परिमंडलमधील कोरोना वीजयोद्धांना मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, शंकर तायडे, पुनम रोकडे आदींची उपस्थिती होती. कोविड-19मुळे सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व बारामती मंडलमधील कोरोना वीजयोद्धा व कार्यालयांना परिमंडल, मंडल कार्यालयांमध्ये गौरविण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com