Eco Friendly Billsakal
पुणे
Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा
Mahavitaran: ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या पाच लाखांहून अधिक वीजग्राहकांना एकूण सहा कोटींपेक्षा अधिक रुपयांचा लाभ मिळतो आहे. छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसद्वारे बिल मिळवणाऱ्या ग्राहकांना सवलतीचा लाभ दिला जातो.
पुणे : वीजबिलासाठी ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पाच लाखांचा टप्पा गाठला आहे. या योजनेत सहभागी झालेल्या पाच लाख तीन हजार ७९५ वीजग्राहकांना सहा कोटी चार लाख ५५ हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.