सोलापूर-कृषी विज्ञान केंद्राकडून तरुणांसाठी ''व्यावसायिक शेळीपालन प्रशिक्षण''

सोलापूर-कृषी विज्ञान केंद्राकडून तरुणांसाठी  ''व्यावसायिक शेळीपालन प्रशिक्षण''
Published on

कृषी विज्ञान केंद्राकडून तरुणांसाठी
‘व्यावसायिक शेळीपालन प्रशिक्षण’
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरच्या वतीने ग्रामीण युवकांसाठी आयोजित करण्यात आलेले चार दिवसीय ‘व्यावसायिक शेळीपालन प्रशिक्षण’ नुकतेच उत्साहात झाले. ग्रामीण भागातील तरुणांना पूरक व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चार दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणामध्ये युवकांना शेळीपालन व्यवसायातील बारकावे शिकवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शेळ्यांच्या विविध प्रगत जाती आणि त्यांच्यासाठी आधुनिक शेडची उभारणी,
शेळ्यांचे प्रजनन व्यवस्थापन, चारा उत्पादन, खाद्य व्यवस्थापन आणि रोग प्रतिबंधक उपाय, शेळीपालनाचा व्यावसायिक प्रकल्प आराखडा तयार करणे आणि विक्रीचे आर्थिक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून प्रशिक्षणार्थी युवकांनी कृषी विज्ञान केंद्राच्या हिरज येथील शेळीपालन प्रात्यक्षिक युनिटला भेट दिली. तिथे शेळ्यांची अचूक निवड करणे, त्यांचे वय ओळखणे आणि दैनंदिन व्यवस्थापन कसे ठेवावे, याचे थेट प्रात्यक्षिक युवकांना दाखविण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांच्या हस्ते सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. तांबडे म्हणाले, ‘‘शेळीपालन हा ग्रामीण भागात शाश्वत उत्पन्न देणारा अत्यंत खात्रीशीर व्यवसाय आहे. केवळ प्रशिक्षण घेऊन न थांबता, युवकांनी पुढील किमान दोन वर्षे कृषी विज्ञान केंद्राच्या सतत संपर्कात राहावे, जेणेकरून व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर वेळीच योग्य उपाय शोधता येतील.’’ कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान शास्त्र) डॉ. प्रकाश कदम यांनी यांनी संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले.

चौकट ---
७ तालुक्यांतील युवकांचा सहभाग
या प्रशिक्षण कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा, बार्शी आणि मंगळवेढा या तालुक्यांतील ३५ निवडक ग्रामीण युवकांनी सहभाग नोंदवला. शेळीपालन व्यवसाय यशस्वीपणे सुरू करण्यासाठी आणि तो फायद्यात आणण्यासाठी अत्यंत आवश्यक व तांत्रिक माहिती या प्रशिक्षणातून मिळाल्याची भावना प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com