Wagholi Fire : वाघोलीत पहाटे गोदमाला आग; कोणतीही जीवितहानी नाही

वाघोली 24 दिवसात घडल्या चार आगीच्या घटना
Fire
Firesakal

वाघोली - येथील उबाळे नगर परिसरातील साई ट्रेडिंग कंपनीला पहाटेच्या सुमारास आग लागली होती. वाघोली 'पीएमआरडीए'च्या दोन अग्निशमन वाहनांनी ही आग काही वेळात विझविली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

या कंपनीत अमूल कंपनीचे बटर, चीज, मिल्क, आईस्क्रीम, ताक, लस्सी, इतर शीतपेय होती. गोदामातील माल तसेच एक पिकअप वाहन जळाले. आग वेळीच आटोक्यात आल्याने दोन वाहने व बाजूचे गोदाम सुरक्षित राहिले.

अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली अग्निशमन केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक अल्ताब पटेल, ज्ञानेश्वर राठोड ,नितीन माने, फायरमन सुरज इंगवले, प्रशांत चव्हाण, संदीप तांबे, प्रकाश मदने, सचिन गवळी, विकास पालवे, महेश पाटील, रिजवान फरास यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

Fire
Chandrakant Patil : पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी

24 दिवसात चौथी आग

● सहा मे - उबाळे नगर परिसरातील एका कंपनीला आग.

● सहा मे - रात्री 11.30 वाजता त्याच परिसरातील इव्हेंटचे मटेरियल असणाऱ्या गोदामाला आग लागून तीन जण होरपळून मृत्यूमुखी पडले.

● 11 मे - टिटॉस हॉटेल जळून खाक झाले.

● 31 मे - साई ट्रेडिंग कंपनीला आग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com