गोकुळ दूध दरवाढ

गोकुळ दूध दरवाढ

Published on

‘गोकुळ’कडून दुधाची दरवाढ

म्हशीच्या दुधात एक, तर गायीच्या दुधात दोन रुपयांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाशी (गोकुळ) संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम व्हावा, यासाठी म्हैस दूध खरेदी दरात एक रुपया, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना महिन्याला सात ते साडेसात कोटींचा लाभ होणार आहे. नवी दरवाढ उद्या (ता. २१) पासून लागू होईल, अशी माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी आज दिली.

ते म्हणाले, ‘‘गोकुळ’च्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत म्हैस दुधाला प्रतिलिटर १५ रुपये, तर गाय दुधाला १० रुपये अशी उच्चांकी दरवाढ दिली असून, संघाकडून दूधवाढीसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केली आहे. म्हैस दुधासाठी ६.० फॅट व ९.० एस. एन. एफ.साठी प्रतिलिटर रुपये ५२.५० वरून रुपये ५३.५० केला आहे. गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ.साठी प्रतिलिटर दर ३४ रुपये वरून ३६ रुपये केला आहे.’’ ते म्हणाले, ‘‘गोकुळ’ संलग्न सात हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून सुमारे १७ लाख लिटर दूध प्रतिदिन संकलन केले जाते. ‘गोकुळ’चे दूध उत्पादक हेच केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा, यासाठी ‘गोकुळ’ नेहमीच कार्यरत राहिला आहे.

‘किकवे’बाबत माहिती घेऊनच निर्णय’

पुणे येथील किकवे येथील डेअरी प्रकल्प खरेदी करावा, यावर आज चर्चा झाली. पुण्यात दररोज पाच लाख लिटर दूध विक्री होते. याचे पॅकिंग तेथे करण्यासाठी हा प्रकल्प घेण्याबाबतची निविदा होती; मात्र, हा प्रकल्प संघाच्या फायद्याचा आहे का, याची तांत्रिक माहिती काय आहे, याबद्दल संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यानंतर या प्रकल्पाच्या तांत्रिक मुद्यांवर चर्चा करून निर्णय घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com