

बसमधून पळवले सव्वालाखांचे दागिने
चार महिलांविरुद्ध गुन्हा; सोलापूर ते अहिल्यानगर प्रवासात घटना
सकाळ वृत्तसेवा
टेंभुर्णी, ता. २२ : सोलापूर ते अहिल्यानगर या शिवाई बसमधून प्रवास करत असताना एका महिलेच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये ठेवलेले सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चार महिलांनी लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी स्नेहल मंगेश शितोळे (वय २८ रा. जुळे सोलापूर) या शुक्रवारी (ता. १३) सकाळी साडेआठ ते पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान सोलापूर ते अहिल्यानगर जाणारी शिवाई एसटी बसने (एम.एच ४९/ बीझेड ७२७१) प्रवास करीत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत सासू व लहान मुलगा होता. या दरम्यान सोलापूर येथील पुणे नाका येथून चार अज्ञात महिला बसमध्ये बसल्या. या चार अज्ञात महिलांनी स्नेहल शितोळे यांच्या ट्रॅव्हल बॅगमधील सोन्याचे दागिने चोरून नेले. या महिला मोडनिंब येथे उतरून पसार झाल्याचे समोर आले आहे. चोरीस गेलेल्या मालामध्ये सुमारे ७५ हजार रुपयांचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र, २५ हजार रुपयांची अर्धा तोळा वजनाची सोन्याची जोंधळ्या मण्यांची माळ, तसेच २५ हजार रुपये किमतीच्या लहान मुलांच्या अंगठयांचा समावेश आहे. या बसमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर घटनेची खात्री पटली. त्यानंतर स्नेहल मंगेश शितोळे व त्यांच्या पतीने टेंभुर्णी ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलस हवालदार संदीप गिरमकर करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.