

टाकळी हाजी, ता. १५ : आईचे पाच लाख रुपये किमतीचे नऊ तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मुलाला शिरूर पोलिसांनी ४८ तासांत अटक केले. रवींद्र दत्तात्रेय जाधव (वय ३३, रा. चांडोह, ता. शिरूर) असे अटक केलेल्या मुलाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. चांडोह (ता. शिरूर) येथील दत्तात्रेय बबन जाधव यांच्या घरातून २८ एप्रिल रोजी नऊ तोळे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा रवींद्र याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.