gokul dalvi and vanita dalvi
sakal
मांडवगण फराटा - रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या इनामगावच्या एका दांपत्याला इस्त्री करण्यासाठी आलेल्या कपड्यांत लाखो रुपयांचे सोन्याचे गंठण सापडले. मात्र, क्षणभराचाही मोह न बाळगता त्यांनी ते मूळ मालकाला परत केले. त्यांच्या या कृतीने परिस्थितीपेक्षा माणुसकी श्रेष्ठ असल्याचा आदर्श घालून दिला आहे.