
वाघोली - चांदीच्या अंगठ्यावर सोन्याचा मुलामा लावून त्यावर ९१६ असा हॉलमार्क मारला. त्या गहाण ठेवून सराफा कडून एक लाख रुपये घेतले व त्याची फसवणूक केली. हा प्रकार वडगावशेरी मधील संघवी ज्वेलर्स मध्ये घडला. फसवणूक करणाऱ्या चार जणांना चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चंदननगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी ही माहिती दिली.