पुण्यात महिलेने केले आठ लाखांचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

- 8 लाख किमतीचे दागिने महिलेने केले लंपास.

पुणे : राजस्थानहून खासगी प्रवासी बसने पुण्याला कुटुंबासह येणाऱ्या एका वृद्धाजवळील तब्बल आठ लाख रुपये किंमतीचे सोने अनोळखी महिलेने लंपास केले. ही घटना गुरूवारी दुपारी तीन वाजता वाकड पुलाजवळ घडले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

कानसिंह राजपुरोहीत (वय 70, रा.कर्वेनगर) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे राजस्थान येथील असून, ते कर्वेनगर येथे वास्तव्य करतात. त्यांचे कर्वेनगर येथे किराणा मालाचे दुकान आहे. फिर्यादी, त्यांची पत्नी व सुन असे तिघेजण गुरूवारी राजस्थानहून खासगी प्रवासी बसने पुण्याला येत होते. त्यांच्यासमवेत मुलाच्या लग्नामध्ये सुनेला घातलेले व काही जुने दागिने असे दोन दागिने ठेवलेले डब्बे व प्लॅस्टिक पिशवी होती. त्यांची बस गुरुवारी दुपारी तीन वाजता वाकड येथील उड्डाणपुलाखाली आली. त्यावेळी बसमध्ये त्यांच्यापासून काही अंतरावरील सीटवर बसलेली एक महिला उतरली. तिने फिर्यादी यांच्या आठ लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिन्यांचे डबे व प्लॅस्टिकची पिशवी चोरुन नेली.

फिर्यादी हे वारजे येथे पोचल्यानंतर बसमधून उतरताना त्यांना त्यांच्या बॅगमधील दागिन्यांचे डबे व पिशवी नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी वारजे पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold of Rupees 8 Lakhs have been Stolen by Woman in Pune