सोन्या-चांदीच्या भावात घसरण

इराण युद्धाचा परिणाम; सुवर्ण बाजारात अस्थिर वातावरण

सोन्या-चांदीच्या भावात घसरण इराण युद्धाचा परिणाम; सुवर्ण बाजारात अस्थिर वातावरण

Published on

सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : अमेरिका व इराणच्या युद्धामुळे सोन्या-चांदीचे भाव रविवारी (ता. १) वाढले होते. मात्र, सोमवारी (ता. २) सोन्याच्या भावात दोन हजार ७०० रुपयांची घट झाली, तर चांदीचे भाव मात्र ‘जैसे थे’च होते. मात्र आजही सोन्याच्या भावात ५८०० रूपयांची, तर चांदीत २४ हजारांची घसरण झाली आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खेळते भांडवल नसल्यानेच ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सोमवारी (ता.२) सोन्याच्या भावात दोन हजार ७०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने एक लाख ६७ हजार ८०० (प्रतिदहा ग्रॅम) विनाजीएसटी पोहोचले होते. आज (ता.४) सोन्याच्या भावात पुन्हा ५८०० रुपयांची घसरण झाली. आज विनाजीएसटी एक लाख ६२ हजार असा भाव होता. शनिवारी (ता.२८) चांदी दोन लाख ९० हजार प्रतिकिलो होती. त्यात रविवारी (ता.१) पाच हजारांची वाढ झाली. चांदीचा भाव दोन लाख ९५ हजार प्रतिकिलो होता. आज मात्र चांदीच्या भावात २४ हजारांची एकदम घसरण होऊन भाव विनाजीएसटी दोन लाख ७१ हजार रुपये (प्रती किलो) पोचला आहे.

बाजारात खेळते भांडवल नाही
दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले की सोने, चांदीचे भाव वाढतात. कारण आयात-निर्यात बंद होते, मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो. अमेरिका-इराण युद्धात मात्र भाव घसरत आहेत. सध्या आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना सुरू आहे. नागरिक खरेदीत हात आखडता घेत आहेत. यामुळे बाजारात खेळते भांडवल नाही. म्हणूनच सोने, चांदीला मागणी नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोन्या-चांदीचे भाव
तारीख--- सोने प्रतिदहा ग्रॅम--- चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी)
२८ फेब्रुवारी : १ लाख ६८ हजार : २ लाख ९० हजार
१ मार्च : १ लाख ७० हजार ५०० : २ लाख ९५ हजार
२ मार्च : १ लाख ६७ हजार ८०० : २ लाख ९५ हजार
४ मार्च : १ लाख ६२ हजार : २ लाख ७१ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com