सोने-चांदीच्या भावात वाढ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ ः सलग दोन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. मात्र, बुधवारी (ता. २८) सोन्याच्या भावात १२०० रुपये, तर चांदीच्या भावात हजार रुपयाची वाढ झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे सोने-चांदीच्या भावात चढउतार होत आहे. दसऱ्यानंतर सोने व चांदीच्या भावात घसरण होत होती. चांदीचे भाव दोन लाखांच्या खाली आले आहेत. दोन दिवसांपासून भावात मोठी घसरण झाली होती. बुधवारी भावात पुन्हा वाढ झाली आहे.
सोने १२०० रुपयांनी महागले
मंगळवारी (ता. २७) सोने एक लाख ४१ हजार ८०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होते. त्यात बुधवारी १२०० रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख ४३ हजार रुपयांवर आले आहे, तर चांदीच्या भावात हजार रुपयाची वाढ झाली. मंगळवारी एक लाख ९७ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर असलेले चांदीचे भाव बुधवारी एक लाख ९८ हजार रुपयांवर आले आहेत.
---
काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव
तारीख---सोने प्रतिदहा ग्रॅम--- चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी)
२४ ऑक्टोबर---१ लाख ४१ हजार ५००--- २ लाख २ हजार
२५ ऑक्टोबर---१ लाख ४१ हजार ५००--- २ लाख २ हजार
२६ ऑक्टोबर---१ लाख ४२ हजार--- १ लाख ९९ हजार
२७ ऑक्टोबर---१ लाख ४१ हजार ८००--- १ लाख ९७ हजार
२८ ऑक्टोबर---१ लाख ४३ हजार--- १ लाख ९८ हजार