
शिरूर : शिरूर बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या पर्समधील सुमारे पावणेपाच लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या दागिण्यांवर डल्ला मारला. आज दुपारी बाराच्या सुमारास ऐन वर्दळीच्या वेळी बसस्थानकावर हा प्रकार घडल्यानंतर खळबळ उडाली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनीही तातडीने बसस्थानकावर येऊन नाकेबंदी केली. मात्र, चोरट्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागू शकला नाही.