Video : संडे हो या मंडे रोज खायचे साडेसहा रुपयाचे अंडे

विवेक शिंदे
Monday, 21 September 2020

रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच कोरोना रुग्णांना अंडी खाण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून दिला जात आहे. त्यामुळे मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. साडेसहा रुपयांपर्यंत एका अंड्याचे बाजारभाव गेले आहेत.

महाळुंगे पडवळ (पुणे) : रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच कोरोना रुग्णांना अंडी खाण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून दिला जात आहे. त्यामुळे मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. साडेसहा रुपयांपर्यंत एका अंड्याचे बाजारभाव गेले आहेत. बाजारभाव वाढल्याने अंडे व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. 
कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेला गैरसमज आणि पसरविलेल्या अफवांमुळे कुक्कुटपालन व्यवसाय कोलमडला होता. मागणी अभावी दरही कोसळले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

लॉकडाउमध्ये वाहतूक बंदी व जिल्हा बंदी असल्यामुळे कोंबड्यांना वेळेवर खाद्य पोचू शकले नाही. अंडी आणि कोंबड्यांची वाहतूक थांबली. अंड्यांचे दरही मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. व्यवसायाचे आर्थिक गणित विस्कटल्याने अनेकांना मागणी अभावी अंडी फेकून द्यावी लागली होती. नुकतीच बाजारभाव वाढ झाल्याने अंडी उत्पादक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

 

रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला डॉक्‍टर देत आहेत. अंड्यामध्ये प्रोटिनचे प्रमाण जास्त आहे. तसेच कोरोना असल्यामुळे अंडी खायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांनाही दररोज आहारात उकडलेली अंडी दिली जात आहेत. 
- विनोद थोरात, ग्राहक 
 

 

कोरोनामुळे अनेक जण आहाराबाबत जागृत झाले असून अंड्यांना मागणी वाढली आहे. सध्या शेकडा 580 रुपयांपर्यंत होलसेल बाजारभाव गेले आहेत. किरकोळ साडे सहा रुपयांना एक अंडे विकले जात आहे. 
- इसाक शेख, विक्रेता, कळंब, ता. आंबेगाव 
 

 

लॉकडाउनमध्ये प्रचंड नुकसान होऊन आर्थिक फटका बसला. अनेकांनी अंडी उत्पादक पोल्ट्री बंद केली आहे. लॉकडाउनमध्ये झालेले नुकसान आता कुठे तरी भरून निघत आहे. बाजारभाव चांगले मिळत असल्याने आता अच्छे दिन आले आहेत. 
- मुकुंद बारवे, पोल्ट्री फार्मचे मालक, महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good days to egg traders