चांगल्या शिक्षणामुळेच माणसाला आरोग्यभान येते; राजेश टोपे

भारती विद्यापीठाचा ५७वा वर्धापनदिन समारंभ करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन साजरा करण्यात आला.
Rajesh Tope
Rajesh TopeSakal

पुणे - ‘उत्तम आरोग्य (Good Health) ही चांगल्या जीवनाची (Life) पहिली पायरी आहे. चांगल्या शिक्षणामुळेच (Education) माणसाला (Citizen) आरोग्यभान येते. कोरोनाच्या संकटाने हे अधोरेखित केले आहे. आरोग्य आणि शिक्षण हेच जीवनाचे महत्त्वाचे (Important) पैलू आहेत,’’ असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केले. (Good education is the key to good health Rajesh Tope)

भारती विद्यापीठाचा ५७वा वर्धापनदिन समारंभ करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन साजरा करण्यात आला. त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, कुलसचिव जी जयकुमार उपस्थित होते.

Rajesh Tope
पुणे: वाहतूक विभागातील पोलिसाने मागितली लाच; गुन्हा दाखल

टोपे म्हणाले, ‘‘डॉ. पतंगराव कदम यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार झाला. ज्ञान, कौशल्य, गुणवत्ता, संशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. शिक्षण केंद्रे ही संस्कार केंद्रे व्हावीत. कोरोना संकटातील भारती हॉस्पिटलचे कार्य उल्लेखनीय आहे.’’

शिवाजीराव कदम म्हणाले, ‘‘विद्यापीठात संशोधन संस्कृती निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राध्यापकांमध्ये ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती असायला हवी.’’

डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, ‘‘भारती विद्यापीठाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या या संकटात विम्याचे सुरक्षा कवच दिले.’’ प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वागत केले.

उच्च शिक्षणाचा विस्तार होत असताना गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. चांगल्या शिक्षकांचा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गुणवत्तावाढीसाठी करणे गरजेचे आहे. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची व्याख्याने तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजेत.

- डॉ. सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com