

Trial run of Hinjewadi–Shivajinagar Red Line metro completed successfully ahead of April launch.
Sakal
पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाइन ३) या २३ किलोमीटर लांबीच्या ‘रेड लाइन’ मेट्रोच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत हा मार्ग टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन ‘पीएमआरडीए’ने केले आहे. या मुळे हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा प्रवास वेगवान आणि सुलभ होणार आहे.