Bhimashankar News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवारपासून होणार दर्शनासाठी खुले

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवार (ता. १५) पासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
Bhimashankar Temple

Bhimashankar Temple

sakal

Updated on

मंचर - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे गेल्या पावणे पाच महिन्यांपासून बंद असलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवार (ता. १५) पासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी व्यवस्था सुरू करण्यात आली असून, दररोज एक हजार भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com