मार्केटयार्ड बंदला उर्त्स्फूत प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीनेही औषध फवारणीसह इतर उपाययोजना केल्या जात आहेत.

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुलटेकडी येथील अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांनी शुक्रवारी मार्केट यार्डातील फळे व भाजीपाला, फुल बाजार विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शेतकऱ्यांनी सहकार्य केल्याने बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहवयास मिळाले.

मोठी बातमी - ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्रातील ४ मोठी शहरं राहणार बंद - मुख्यमंत्री...

उद्या शनिवारी (ता.२१) साप्ताहिक सुट्टी असल्याने फळे व भाजीपाला विभाग बंद राहणार आहे. तसेच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. तर बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरू राहणार असल्याचे प्रशासक बी जे. देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे बाजारातील संघटना आणि बाजार समितीचे एकमत नसल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबईसाठी मोठा निर्णय; वाचा देशात कोठे किती...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीनेही औषध फवारणीसह इतर उपाययोजना केल्या जात आहेत. आडत्यांनी केलेल्या बंदच्या विरोधात बाजार समितीने बाजार सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली होती तसेच शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केले होते मात्र बाजार समितीच्या या आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.

CoronaVirus : वर्क फ्रॉम होम करा सुखकारक

सोमवारी मार्केट यार्डात गर्दीची शक्यता

सलग तीन सुट्ट्या नंतर सोमवारी मार्केटयार्ड सोमवारी मार्केट यार्ड सुरू होणार आहे. त्यामुळे बाजार मोठ्या प्रमाणावर शेतीमाल आवक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधीच व्यवस्था करण्याची गरज आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good response to Market Yard bandh in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: