Vidhan Sabha 2019 : मुक्ता टिळकांच्या प्रचारार्थ महिला रॅलीला मोठा प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 October 2019

स्वारगेट : भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुक्ता टिळक यांना शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे अशी ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्हे यांनी दिली.​

स्वारगेट : भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुक्ता टिळक यांना शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे अशी ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्हे यांनी दिली.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, शिवसंग्राम पक्षांच्या कसबा मतदार संघातील उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिवसेना, भाजप, रिपाईचे नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले वाड्यामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून निघालेल्या या महिला रॅलीमध्ये महिला कार्यकर्त्यांनी  मोठा प्रतिसाद दिला. लोहीयानगर मार्गे लाल महाल येथे रॅलीची सांगता झाली.

यावेळी गोर्हे म्हणाल्या, 'पुणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवार निवडून येणार याबद्दल शंका नाही. बंडखोरांनी कितीही कांगावा केला तरी, जनतेला असते ठाऊक आहे. टिळक म्हणाल्या,' महायुतीने केलेली विकास कामे नागरिकांना भावली आहेत. त्यामुळेच महायुतीच्या सर्वच उमेदवारांना वाढता प्रतिसाद मिळत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good response to the women rally for Mukta Tilak campaign in maharashtra Vidhan Sabha 2019