
पुणे : ‘‘मागासवर्गीय हिंदू म्हणून आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळवली आणि नंतर मात्र धर्मांतर केले, तर त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. असे आरक्षणाचा लाभ घेऊन धर्मांतर केलेले लोक शोधा आणि त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी करा,’’ असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.