Gorakshanath Hill Gurupurnima: आंबेगावच्या गोरक्षनाथ टेकडीवर गुरुपौर्णिमा उत्सवाला हजारो भाविकांची गर्दी; नाथपंथीय साधूंच्या उपस्थितीत पालखी सोहळा

गोरक्षनाथ टेकडीवरी गुरुपौर्णिमेनिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम, अखंड नामस्मरण व जयघोष; विविध राज्यांतील नाथपंथीय साधू-भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण
gorakshanath tekdi guru purnima festival shevawadi ambegaon ravinath khadeshwari maharaj

gorakshanath tekdi guru purnima festival shevawadi ambegaon ravinath khadeshwari maharaj

Sakal

Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी येथील गोरक्षनाथ टेकडीवर योगी रविनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज यांच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त बुधवारी (ता. २९) भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, हरियाना, राजस्थान, वापी व सिलवासा येथील नाथपंथीय साधू आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवसभर गोरक्षनाथ टेकडी परिसरात "खडेश्वरी महाराज की जय"च्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com