Ambe Government Ashram School
sakal
जुन्नर - जुन्नर तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील आंबे येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता चौथी) परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
या परीक्षेसाठी शाळेतील नऊ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या परीक्षेत शाळेचा शंभर टक्के निकाल लागला तर पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. अशी माहिती मुख्याध्यापक यू. एन. वाडीकर यांनी दिली.