esakal | शासन आपल्या दारी स्तुत्य उपक्रम: सुभाष वीर
sakal

बोलून बातमी शोधा

शासन आपल्या दारी स्तुत्य उपक्रम

शासन आपल्या दारी स्तुत्य उपक्रम: सुभाष वीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री-पिसोळी : शासकीय योजना आणि बँकिंगसाठी आधार लिंक, पोस्टाचे खाते आणि आधार कार्ड आवश्यक आहे. शासन आपल्या दारी उपक्रम राबवून नागरिकांची सोय केली, हा स्तुत्य उपक्रम आहे, असे पोस्ट खात्याचे झोनल अधिकारी सुभाष वीर यांनी सांगितले.

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे CET देऊ न शकलेल्यांना पुन्हा संधी: उदय सामंत

हांडेवाडीतील सातवनगरमध्ये भाजप ओबीसी सेलचे हडपसर विधानसभा अध्यक्ष संजय सातव व भारतीय टपाल विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी भाजप विधानसभा संघटक गणेश घुले, युवा नेते अभिजित सातव, भाजप महिला नेत्या सविता सातव, संदीप नलवडे, संकेत सोनवणे, बापू मिरेकर, संजय भुजबळ, फरदिन भिस्ती, विकास भुजबळ, संघाचे अध्यक्ष धर्मराज म्हेत्रे, पोपट वाडकर, स्मिता गायकवाड, शोभा लगड, डॉ मंगेश वाघ, सुफियांन खान, बाळासाहेब घुले, अॅड. अनुप अवस्थी उपस्थित होते.

संजय सातव म्हणाले की, हांडेवाडीमधील सातवनगरमध्ये आज (सोमवार, दि. २७ सप्टेंबर) ६९ नागरिकांनी पोस्टाची खाती उघडली, २८४ नागरिकांचे नवीन आधारकार्ड बनवून दिले, ११८ नागरिकांचे मोबाईल बँकिंगसाठी लिंक करून दिले. कष्टकरी, भाडेकरी, कामगारवर्ग, स्थानिक नागरिक आणि रिक्षावाल्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

loading image
go to top