Milk Subsidy : दूध अनुदानाचे सरकारने थकवले १५२ कोटी

शासनाच्या १२ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजना सरकारने जाहीर केली.
Milk
Milksakal
Updated on

निरगुडसर - सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या अनुदानाचे थकलेले ११ कोटी आणि ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे १४१ कोटी असे एकूण पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे १५२ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने थकवले आहे. सध्या दूध व्यवसायात भरमसाठ वाढलेला उत्पादन खर्च यामुळे दूध धंदा परवडत नाही, अशा मध्ये सरकारने अनुदान रखडवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

शासनाच्या १२ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजना सरकारने जाहीर केली, सदर योजना १ जुलै २०२४ पासून सुरू झाली असून, सदर योजनेत पुणे जिल्ह्यातील ११८ सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांनी सहभाग नोंदवला आहे.

१ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यासाठी सरकारने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी दुधाला फॅट ३.५ आणि ८.५ एसएनएफ साठी ३० रुपये दर होता या तीन महिन्याचे १७९ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले असून अजून ११ कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.

१ ऑक्टोबर २४ पासून प्रतिलिटर अनुदान २ रुपये वाढ करून ७ रुपये अनुदान देण्याचे जाहीर करून दूध दर फॅट ३.५ आणि ८.५ एस एन एफ साठी २८ रुपये करण्यात आला होता. हे अनुदान शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही.

पुणे जिल्ह्यातील ५ लाख ७७ हजार ६०७ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या २० कोटी १६ लाख ३४ हजार ३०१ लिटर दुधाचे प्रति लिटर ७ रुपये दराने १४१ कोटी ७ लाख ८२ हजार ७०९ रुपये अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. मागील जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याचे १७९ कोटी वाटप केले परंतु अद्याप ११ कोटी सरकारकडून मिळणे बाकी आहे.

जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यासाठी ७०० हून अधिक प्रस्ताव अनुदानासाठी पुणे जिल्यातील संस्थानी जमा केले होते परंतु ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याच्या अनुदानासाठी ४३९ फाईल जमा झाल्या आहेत कारण की अनुदानासाठी सरकारच्या जाचक अटी, दूध अनुदानही वेळेत आणि मिळेल की नाही यातून दूध अनुदानासाठी प्रस्ताव दिले देखील नाही.

मार्च महिना सुरू झाला तरी देखील अनुदान मिळेना त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.आता मार्च महिन्यात जिल्हा बँकेचे सोसायटीचे कृषी कर्ज शेतकऱ्यांना भरायचे आहे ते भरावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

  • ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन महिन्यासाठी प्रति लिटर सात रुपये दराने अनुदान.

  • पुणे जिल्ह्यातील ४३९ प्रस्ताव सरकारकडे जमा.

  • पुणे जिल्ह्यातील ५ लाख ७७ हजार ६०७ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान रखडले.

  • अनुदानाचे एकूण दूध: २० कोटी १६ लाख ३४ हजार ३०१ लिटर.

  • रखडलेले अनुदान: १४१ कोटी ७ लाख ८२ हजार ७०९ रुपये.

  • जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या अनुदानापौटी १७९ कोटी शेतकऱ्यांना वाटप.

  • जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यातील ११ कोटी रुपये अजून शेतकऱ्यांना देणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com