Foldable Helmet
sakal
मंचर - ‘आत्मनिर्भर भारत’च्या संकल्पनेला बळ देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या नावीन्यपूर्ण संशोधनाची छाप पाडली आहे. पुणे ग्रामीणमधील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द(ता.आंबेगाव) येथील विद्यार्थ्यांनी दुचाकीस्वारांसाठी घडी करता येणाऱ्या (फोल्डेबल) हेल्मेटची अभिनव रचना विकसित केली आहे.