
पुणे : "सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे समाजाकडे, निसर्गाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असते. इतरांना जे काम करणे शक्य होत नाही, ते अधिकारी म्हणुन आपल्याला करता येते. त्यामुळे आपल्या अनुभवाचा फायदा हा समाजासाठीही कसा होईल, याकडे सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, अधिकाधिक चांगले लेखनावर भर द्यावा' असे मत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे (यशदा) महासंचालक निरंजन सुधांशु यांनी शुक्रवारी व्यक्त केले.