
पुणे: दिव्यांग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लांब अंतर प्रवास करावा लागू नये, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा थेट तालुका स्तरावर उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत आदेश दिले असून, प्रत्येक जिल्ह्यातील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल.