

MLA Shankar Mandekar
- पांडुरंग साठे
कोळवण - महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुके असलेल्या तालुक्यांच्या यादीतून मुळशी तालुका वगळला होता. तालुक्यातील असलेली वेगवेगळी भौगोलीक परिस्थिती व यामुळे तालुक्यातील विविध महसूल मंडळात असमान पर्जन्यमान होते. म्हणजेच तालुक्यातील माले महसूल मंडळातील पाऊस हा सर्वाधिक आहे. तर दुसरीकडे ताथवडे महसूल मंडळात २७ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा प्रकारची पावसाची असमान स्थिती आहे. असे असूनही पावसाने तालुक्यात सरासरीच्या ९% अधिक पाऊस पडला. या व इतर गोष्टींमुळे तालुका एनडीआरएफच्या निकषानुसार तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुके असलेल्या यादीत झाला नाही.