पुणे - मुळा नदीवर पूल बांधून अनेक वर्ष झाली, पण या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची जागा पुणे महापालिकेला ताब्यात घेता आलेली नाही. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट आज (ता. ४ ) महापालिकेत येऊन थेट आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत चर्चा केली. जर जागा मालक जागा ताब्यात देत नसतील तर सक्तीचे भूसंपादन करा आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.