
पुणे : जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र बेघर नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे उपलब्ध करून देण्याच्या कार्यवाहीला गती द्या, तसेच एकही पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी दिले.