Supriya Sule
sakal
पुणे - 'महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण केले जात आहे, तसेच राज्यातील मराठी शाळा अडचणीत आल्या आहेत. शाळा टिकल्या पाहिजेत, मराठी जगली पाहीजे. त्यासाठी राज्य सरकारचे काय नियोजन आहे ? एकूणच शाळा व शिक्षणाच्या बाबतीत या सरकारची भूमिका अतिशय उदासीन आहे.' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणाच्या समस्येवरून महापालिकेसह राज्य सरकारवर जोरदार टीका केली.